Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर-हवेलीमध्ये आबा आणि बापू यांच्यात तुल्यबळ लढत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 November 2024, 18:06
Analysis of Shirur-Haveli assembly constituency pune

लोणी काळभोर: २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिरूर-हवेली मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार अशोक पवार व महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर कटके यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभा झाल्यानंतर सुरुवातीला सोपी व एकतर्फी वाटणारी ही लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. प्रचाराच्या पहिल्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे माऊली कटके हे आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या विरोधात व्यूहरचना आखत राष्ट्रवादीसहित महायुतीने नेते ज्ञानेश्वर कटके यांच्या मागे ताकद लावली आहे. मतदारसंघात दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पातळीवर निधी आणण्यात चांगला प्रयत्न केला आहे. सध्या मतदारांपर्यंत पोचण्यासाठी त्यांची मतदारसंघात गावनिहाय पायपीटही सुरू आहे. तसेच शहरी मतदाराला बांधून ठेवण्यासह त्याला मतात कनव्हर्ट करण्यासाठी त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र स्पर्धा लागली आहे.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यावर राष्ट्रवादी पक्षाचे प्राबल्य चांगले आहे. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर उभे आहेत. त्यामुळे एक प्रकारे या मतदारसंघावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विचारांचा आमदार राहणार आहे, हे नक्की. येथे भाजपने दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या माध्यमातून चांगला जम बसवला आहे. ते महायुतीमध्ये भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते, परंतु ही जागा राष्ट्रवादीला गेल्याने त्यांनी ताकद कटके यांच्यामागे उभी केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. याबरोबरच महायुतीकडून घोडगंगा कारखान्याचा प्रश्न आक्रमकपणे प्रचारात मांडला जात आहे. नाराज शेतकरी सभासदांची मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी महायुतीने रणनीती महायुतीने आखली आहे. कारखान्याचा प्रश्न आमदार पवार यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे.

दुसऱ्या बाजूला आमदार अशोक पवार स्वतः शरद पवार मैदानात उतरले असून ते शक्य ती गोष्ट करत आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेत चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. याचा फायदा आमदार पवार यांना कितपत होतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या स्थितीला कटके यांचे पारडे जड आहे. पुढील दोन दिवसांत प्रचार कसा होतो आणि बूथ मॅनेजमेंट कोणाचे उत्तम होते, त्यावर निकाल ठरणार आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिरुर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पहाणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या १९६२ ते २०१९ पर्यंतच्या १३ विधानसभा निवडणुकांपैकी ६ वेळा काँग्रेस पक्षाचा उमेदवार येथे निवडून आला आहे. ३ वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा, २ वेळा भाजपचा, तर जनता पक्ष व प्रजा सोशलिस्ट पार्टी यांचा प्रत्येकी एकदा उमेदवार निवडून आला आहे. या १३ निवडणुकांपैकी सर्वात मोठा विजय २०१९ मध्ये विद्यमान आमदार अशोक पवार यांनी ४१५०४ मताधिक्याने मिळवला होता. सर्वात छोटा विजय काँग्रेसचे उमेदवार पोपटराव गावडे यांनी १९९५ सालच्या निवडणुकीत मिळवला होता. त्यांनी अपक्ष उमेदवार बाबूराव पाचर्णे यांचा ६७८ मतांनी पराभव केला होता.

२०१९ च्या निवडणुकीत शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार १४५१३१ एवढी मतं मिळवत विजयी झाले होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाबुराव पाचर्णे हे १०३६२७ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांचा ४१५०४ मतांनी पराभव झाला. या मतदारसंघातील मताधिक्‍याच्या दृष्टीने हा सर्वात मोठा विजय होता. मताधिक्‍याच्या दृष्टीने दुसरा मोठा विजय १९८० मध्ये सूर्यकांत पलांडे यांनी २३७५१ मताधिक्‍याने मिळवला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू) चे उमेदवार सूर्यकांत पलांडे यांनी ३८६४८ मतं मिळवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) चे उमेदवार रसिकलाल धारिवाल (१४८९७ मते) यांचा पराभव केला होता.

शिरुर मतदारसंघातील मागील दहा विधानसभा निवडणुकांंचा अभ्यास केला असता २०१९, १९८० व २०१४ या तीन निवडणुकांमध्ये विजयी उमेदवाराचे मताधिक्‍य दहा हजारांपेक्षा जास्त आहे. उर्वरित सात निवडणुकांमध्ये विजयी उमेदवाराचे मताधिक्य दहा हजारांपेक्षा कमी आहे. चालू निवडणुकीत ही विजयी उमेदवाराचे मताधिक्‍य दहा हजाराच्या जवळपास असण्याची शक्यता जास्त आहे. एकंदरीत ही निवडणुक चुरशीची होणार आहे. वाघोली, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व उरुळी कांचन ही चार मोठ्या मतदार संख्येची गावे ज्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील, तो उमेदवार निवडून येईल असे सर्वसाधारण चित्र आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Certificate to get after voting by scanning QR code pune

मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.