Loksabha Election 2024 : देशभरातील सर्वच पक्षांची आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. अशातच तृणमूल काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 42 उमेदवारांची नावं आहेत. तृणमूल काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार नुसरत जहा यांना मात्र पक्षाकडून आगामी निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलं असून क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूरमधून तिकीट देण्यात आलं आहे. युसूफ पठाण काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
नुसरत जहाँ यांचा पत्ता कट, तर शत्रुघ्न सिन्हा पुन्हा रिंगणात
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आसनसोलमधून टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा लोकसभा निवडणूक लढवतील. तसेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एकट्यानं निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली. त्यासोबतच आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार असल्याचं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं होतं. तसेच, अखिलेश यादव यांच्याशी यूपीतील एका जागेवर निवडणूक लढवण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
युसूफ पठाण यांच्याशिवाय अन्य 41 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. ज्यामध्ये कांठी येथील उत्तम बारीक, घाटल येथील अभिनेते देब, झारग्रामचे पद्मश्री कालीपदा सोरेन, मेदिनीपूरचे जून मालिया, पुरुलियाचे शांती राम महतो, बांकुरा येथील अरुप चक्रवर्ती, वरदमन दुर्गापूर- कीर्ती आझाद, बीरभूमचे शताब्दी रॉय, बिष्णुपूरचे सुदाता मंडल खान, विष्णुपूरचे सुदाता मंडल खान यांचा समावेश आहे.
टीएमसीने उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे
कूचबिहार- जगदीशचंद्र बसुनिया
अलीपुरद्वार- प्रकाश चिक बडाइक
जलपाईगुडी- निर्मल चंद्र रॉय
दार्जिलिंग- गोपाल लामा
रायगंज- कृष्णा कल्याणी
बालूरघाट- बिप्लब मित्र
मालदा उत्तर- प्रसून बॅनर्जी
मालदा दक्षिण- शहनाज अली रायहान
जंगीपूर- खलीलुर रहमान
बहरामपूर- युसूफ पठाण
मुर्शिदाबाद- अबू ताहिर खान
कृष्णनगर- महुआ मैत्र
राणाघाट- राज्याभिषेक
बंगा- विश्वजित दास
बॅरकपूर-पार्थ भौमिक
दम दम- सौगता रॉय
बारासात- काकली घोष दस्तीदार
बशीरहाट- हाजी नुरुल इस्लाम
जयनगर- प्रतिमा मंडळ
मथुरापूर- बापी हलदर
डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी
जाधवपूर- सयानी घोष
दक्षिण कोलकाता – माला रॉय
उत्तर कोलकाता – सुदीप बॅनर्जी
हावडा – प्रसून बॅनर्जी
उलुबेरिया – सजदा अहमद
श्रीरामपूर-कल्याण बॅनर्जी
हुगळी – रचना बॅनर्जी
आरामबाग – मिताली बाग
तमलूक – देवांशू भट्टाचार्य
काठी – परिपूर्ण बारीक
घाटाळ-देव
झारग्राम- कालीपाद सारण
मेदिनीपूर- जून मलिया
पुरुलिया- शांतीराम महतो
बांकुरा- अरुप चक्रवर्ती
पूर्व बर्दवान- डॉ शर्मिला सरकार
दुर्गापूर- कीर्ती आझाद
आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
बोलपूर- असित माळ
बीरभूम- शताब्दी रॉय
बिष्णुपूर- सुजाता मंडल खान