नवी दिल्ली: रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (RRTS) च्या गाड्यांचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या गाड्या ‘नमो भारत’ म्हणून ओळखल्या जातील, असे पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरचा 17 किमीचा प्राधान्य विभाग उद्घाटनानंतर 21 ऑक्टोबर रोजी प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.
साहिबााबाद आणि दुहाई डेपो दरम्यान या विभागात पाच स्थानके आहेत, ज्यात साहिबााबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डेपो यांचा समावेश आहे. दिल्ली ते गाझियाबादमार्गे मेरठपर्यंत विस्तारणाऱ्या या कॉरिडॉरची पायाभरणी 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली.
या वेगाने ट्रेन धावेल
पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी (18 ऑक्टोबर) एका निवेदनात म्हटले होते की, पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीतून नवीन जागतिक दर्जाच्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे देशातील प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन करण्यासाठी आरआरटीएस प्रकल्प विकसित केला जात आहे. आरआरटीएस ही सेमी-हायस्पीड आणि हाय फ्रिक्वेंसी कम्युटर ट्रान्सिट सिस्टीम आहे, ज्यामध्ये ट्रेन ताशी 180 किलोमीटर वेगाने धावू शकते.
ट्रेन कधी उपलब्ध होईल?
पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, आरआरटीएस हा एक परिवर्तनकारी प्रादेशिक विकास उपक्रम आहे, ज्याची रचना इंटरसिटी प्रवासासाठी दर 15 मिनिटांनी हाय-स्पीड ट्रेन उपलब्ध करून देण्यासाठी केली गेली आहे. तसेच आवश्यकता असल्यास वारंवारता पाच मिनिटांपर्यंत कमी केली जाऊ शकते.
एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन) मध्ये एकूण आठ आरआरटीएस कॉरिडॉर विकसित केले जातील, असे निवेदनात म्हटले आहे. ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन कॉरिडॉर राबविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये दिल्ली-गाझियाबाद-मेरठ, दिल्ली-गुरुग्राम-एसएनबी-अलवर आणि दिल्ली-पानिपत कॉरिडॉरचा समावेश आहे.
हेही वाचा:
मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होणार
Narayan Rane : मी 96 कुळी मराठा, कुठलाही मराठा कुणबी दाखला घेणार नाही: नारायण राणे