Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : फक्त पैशांसाठी ! महिलेने शेजाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, ‘ते’ फोटोही काढायला सांगितले, पैसे मिळणे बंद होताच खरं रूप दिसलं…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 19 October 2023, 19:52

पुणे : शेजारी राहणाऱ्या महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका व्यक्तीकडून ८  लाख ३९ हजार ४०० रुपयांची खंडणी उकळली. यानंतर पुन्हा १० लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी पती-पत्नीसह तिघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला.

याबाबत गणेश चंद्रकांत माने (वय 38 रा. आंबेगाव खु, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महिला, तिचा पती व दाजी तेजेंद्र त्रिपाठी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान संबंधित महिलेने सुद्धा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्यादी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून, त्यांनी पुण्यात फ्लॅट घेतला आहे. त्याच्या फ्लॅटच्या समोरच आरोपी महिला राहते. तिने स्वत:हून फिर्यादी यांच्यासोबत ओळख वाढवून घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक वाढवल्याने शारीरिक संबंध झाले. त्यावेळी महिलेने शारीरिक संबंध ठेवतानाचे फोटो फिर्यादी यांना काढायला सांगितले. यानंतर आरोपी महिलेने फिर्य़ादी यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीतर घरच्यांना सांगण्याची धमकी दिली.

प्रकरण मिटवण्याचा बहाणा करत खंडणी..
महिलेचा दाजी तेजेंद्र त्रिपाठी याने प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या मोबाईलमधील फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले. त्यानंतर तिचा पती आणि दाजी त्रिपाठी यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी पैसे मागितले.

…अखेर पोलिसांत धाव..
महिलेने गेल्या वर्षभरात फिर्य़ादी यांच्याकडून ८ लाख ३९ हजार रुपये उकळले. त्यानंतरही तिने आणखी १० लाख रुपयांची खंडणी मागितली. महिलेकडून वारंवार होत असलेली पैशांची मागणी आणि तिच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गणेश माने यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

फिर्यादीवरच बलात्काराचा गुन्हा दाखल..
आरोपी महिलेने गणेश माने यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच संबंध ठेवतानाचे फोटो काढले. हे फोटो दाजी तेजेंद्र त्रिपाठी यांनी आपल्या मोबाईलमध्ये घेऊन ते फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गणेश माने आणि दाजी तेजेंद्र त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29

वाल्मिक कराड असलेल्या बीड जेलमध्ये ‘ऑल इज वेल’! तिन्ही उच्चस्तरीय पथकांचा मोठा निष्कर्ष,नेमकं काय समोर आलं?

Tuesday, 27 October 2026, 18:53

पुण्याच्या रस्त्यांचा होणार कायापालट! महापालिकेचा तब्बल ११६.५० कोटींचा सर्वात मोठा प्लॅन तयार

Tuesday, 27 October 2026, 18:50

लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेत दिवसा माल उतरवण्यास सक्त मनाई! नियम मोडल्यास होणार वाहतूक पोलिसांची कठोर कारवाई

Tuesday, 27 October 2026, 18:48

थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतात! गणेशभक्त आणि ग्रामस्थांचे श्रमदानातून स्वच्छता अभियान; प्राचीन धार्मिक वारशाच्या संवर्धनाची मागणी

Tuesday, 27 October 2026, 18:43
Next Post

एशियन विकास बँकेचे शिष्टमंडळ आणि आमदार राहुल कुल यांच्यात भेट; खडकवासला कालवासह विविध सिंचन प्रकल्पांबाबत झाली चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp