Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेत दिवसा माल उतरवण्यास सक्त मनाई! नियम मोडल्यास होणार वाहतूक पोलिसांची कठोर कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 27 October 2026, 18:48

पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलिसांनी मालवाहतुकीबाबत महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडईसह प्रमुख व्यापारी भागांमध्ये हलक्या मालवाहू वाहनांतून मालाची ने-आण आणि चढ-उतार करण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, २६ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ९ वाजेपर्यंतच मालाची चढ-उतार करता येणार आहे.

दिवाळीच्या काळात कपडे, दागिने, मिठाई, सजावटीचे साहित्य आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी पुण्यातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होते. या काळात दुकानांमध्ये माल पोहोचवणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता राखण्यासाठी वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, भोरी आळी, गणेश पेठ, तापकीर गल्ली, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि बाजीराव रस्ता या प्रमुख व्यापारी भागांमध्ये मालवाहतुकीसाठी वेळेचे निर्बंध लागू असतील.

या भागांमध्ये दिवसा खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने मालवाहू वाहनांमुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी मालाची वाहतूक तसेच चढ-उताराचे नियोजन निर्धारित वेळेनुसार करणे आवश्यक आहे.

मालवाहू वाहनचालक, व्यापारी आणि दुकानदारांनी पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. हे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी जारी केले आहेत.

दिवाळीच्या खरेदीसाठी मध्यवर्ती पुण्यात जाणाऱ्या नागरिकांनीही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. तसेच, बाजारपेठांमध्ये मालाची ने-आण करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नव्या निर्बंधांची दखल घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाल्मिक कराड असलेल्या बीड जेलमध्ये ‘ऑल इज वेल’! तिन्ही उच्चस्तरीय पथकांचा मोठा निष्कर्ष,नेमकं काय समोर आलं?

Tuesday, 27 October 2026, 18:53

पुण्याच्या रस्त्यांचा होणार कायापालट! महापालिकेचा तब्बल ११६.५० कोटींचा सर्वात मोठा प्लॅन तयार

Tuesday, 27 October 2026, 18:50

लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेत दिवसा माल उतरवण्यास सक्त मनाई! नियम मोडल्यास होणार वाहतूक पोलिसांची कठोर कारवाई

Tuesday, 27 October 2026, 18:48

थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतात! गणेशभक्त आणि ग्रामस्थांचे श्रमदानातून स्वच्छता अभियान; प्राचीन धार्मिक वारशाच्या संवर्धनाची मागणी

Tuesday, 27 October 2026, 18:43

लेकिच्या कन्यादानाचं स्वप्न अधुरंच! घरात साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांचा मृत्यू; आनंदाच्या घरावर दुःखाचा डोंगर

Tuesday, 27 October 2026, 18:01

पुण्यात ‘फर्जी’ स्टाईल बनावट नोटा बनवण्याचा प्लॅन; सॉफ्टवेअरच्या मदतीने नोटा बनवल्या प्लॅन आखला पण पुणे पोलिसांना संशय येताच….

Tuesday, 27 October 2026, 17:43
Next Post

पुण्याच्या रस्त्यांचा होणार कायापालट! महापालिकेचा तब्बल ११६.५० कोटींचा सर्वात मोठा प्लॅन तयार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp