Israel Hamas War : नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू आहे त्याला महिना उलटला आहे. अजूनही इस्रायलकडून गाझा पट्टीत तीव्र हल्ले करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे हमासने इस्रायलच्या नागरिकांना बंदी बनवल आहे. सध्या तीन महिलांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. अलजजिराच्या रिपोर्टनुसार, हमासनेच तीन महिलांना ओलिस ठेवले होते. आता त्यांचा व्हिडीओ जारी केला आहे.
9500 हून अधिक जणांचा मृत्यू
आत्तापर्यंत 9500 हून अधिक लोकांचा मृत्यू : इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत सुमारे 9500 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. (Israel Hamas War) तर गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार, युद्धात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत आठ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. त्याचबरोबर इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ओलिस महिलांचा व्हिडीओ : 76 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तीन इस्रायली महिला दिसत आहेत. यामध्ये एक महिला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू लोकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत असे म्हणत आहे. त्यांच्याकडे आपल्या सुटकेसाठी ओलिसांची अदलाबदली करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. (Israel Hamas War) 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायली नागरिकांना बंदी बनवलं होतं. एलेना ट्रुपानोव, डॅनियल अलोनी आणि रॅमन किर्ष्ट अशी ओलीस ठेवलेल्यांची नावे आहेत.
युद्धाला महिना उलटला : इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात 31 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने काही मिनिटांत गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने 5 हजारांहून अधिक रॉकेट डागले होते.(Israel Hamas War) इस्रायलमध्ये घुसून सुमारे 1000 हून अधिक लोकांची हत्या केली. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायल हल्ल्यावेळी इस्रायली नागरिकांचं अपहरण केलं आणि अजून त्यांना ओलिस ठेवलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
मोठी बातमी! पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलने केली युद्धाची घोषणा
Big News : भरदिवसा तेलंगणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर..आरोपीला अटक