मुंबई : मंत्रालयात पुन्हा आंदोलन करण्यात आले आहे. मंत्रालयात तैनात असलेली सुरक्षा भेदून एकाने आंदोलन केले आहे. आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उड्या मारल्याची घटना घडली आहे. यानंतर मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली.
आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी धाव घेत सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या आणि आंदोलकाला ताब्यात घेतले. मंत्रालयात तरुणाने कोणत्या कारणासाठी आंदोलन केले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, पोलिसांच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.