नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील सुनावणी ही लांबणीवर गेली आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजेच 31 ऑक्टोबरला होणार सुनावणी होती. आता ही सुनावणी दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवावा, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आता दिवाळीनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. पक्ष आणि चिन्हासंबधीची सुनावणी नोव्हेंबरमध्ये यावर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार एकनाथ शिंदे गटाला दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका न्यायालयात दाखल झाली होती. पण त्यावर अद्याप सुनावणी झाली नव्हती. मंगळवारी पहिल्यांदाच या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुढे लांबणीवर गेली असून तीन आठवड्यानंतर होणार आहे.