Mumbai News : पुणे : एकमेकांच्या सहमतीने दोन प्रौढ व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यास, कलम ३७६ अंतर्गत ते बलात्कार ठरू शकत नाही, असा महत्त्वापूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. याप्रकरणी दाखल झालेली फौजदारी याचिका न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी निकाली काढली.
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
या प्रकरणातील पीडित महिला आणि आरोपी दोघेही पुण्यातील आहेत. आरोपीच्या देखरेखीखाली असलेल्या एका संस्थेत महिला काम करीत होत्या. (Mumbai News) त्या वेळी आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखववून बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. आरोपीने अॅड. हर्षल सुनील पाटील आणि अॅड. पीयूष तोष्णीवाल यांच्यामार्फत तक्रार रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. या तक्रारीत आरोपीविरोधात बलात्कारासह मारहाण, धमकावण्याच्या कलमान्वये शिक्षापात्र गुन्ह्यासाठी ३० एप्रिल २०२२ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा गुन्हा जानेवारी २०१९ ते तीन एप्रिल २०२२ या कालावधीत घडल्याचे तक्रारदार महिलेच्या जबाबावरून दिसून येते.
दरम्यान, संबंधित तक्रारदार महिलेने सहमतीने लैंगिक संबंध ठेवले. याबाबत महिलेच्या खुलाशाचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. (Mumbai News) त्यात आरोपीने महिलेचे झालेले नुकसान भरून काढले आहे. त्यांचे संबंध सहमतीने होते. त्यामुळे संबंधित गुन्हा रद्द करण्यास कोणताही आक्षेप नाही, असे महिलेने म्हटले होते.
या गुन्ह्यात बलात्काराचे कलम लागू होत नसल्याने गुन्हा रद्द करण्याची मागणी बचाव पक्षाने केली. (Mumbai News) न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा ‘शंभू कारवार वि. उत्तर प्रदेश राज्य’ यात दिलेला न्यायनिवाडा ग्राह्य धरून एफआयआर रद्द केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हुंड्यासाठी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
Pune News : खडकी येथे नदीपात्रात तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Pune News : ललित पाटीलच्या जीवाला धोका, कधीही एन्काऊंटर होऊ शकतो? शिवसेना नेत्याच्या विधानाने खळबळ