Mumbai News : मुंबई : राज्यात मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले असताना गृहमंत्री इतर राज्यांत प्रचारासाठी फिरताहेत. राज्यात काय घडतंय त्याची यांना माहिती नाही. फडणवीस यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस फसवत आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले ते बरोबरच आहे. पाटलांना जसा फडणवीस यांनी दगाफटका केला, तसा सर्वांनाच केला आहे. भाजप हा पक्ष विश्वासू नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही दगाबाजी केली. आता अजित पवार गटाने सांभाळून राहिले पाहिजे. अजित पवार गटाला विनम्र विनंती आहे, संभल के रहो, इस भाजप से… असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
फडणवीसांच्या राजीनाम्याची केली मागणी
एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेतून घेऊ असे उद्गार फडणवीस यांनी काढले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. शिंदे अपात्र होणार आहे हे त्यांना माहीत आहे. हे माहीत होतं तर मग उद्धव ठाकरेंचा पक्ष का फोडला? ठाकरेंशी दगाफटका केलाच पण घटक पक्षाशीहा दगाफटका केला. (Mumbai News) यामुळेच अजित पवार गटाला माझी विनम्र विनंती आहे, कधी तरी एका ताटात आपण जेवलोय. ते शिंदेंना धोका देत आहेत. त्यामुळे संभल के रहो, इस भाजप से, असे उद् गार सुप्रिया सुळे यांनी काढले.
ड्रग्स माफिया असेल, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारला अपयश आले आहे. हे अपयश देवेंद्र फडणवीस यांचे अधिक आहे. त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. मराठा आंदोलन सुरू आहे. गृहमंत्र्यांचं अपयश आहे. (Mumbai News) ते काय करतात इंटेलिजन्सचे इनपूट असेल ना. ते इतर राज्यात प्रचार करतात. तिकडे जातात. राज्यात काय घडतंय त्याची माहिती नाही. फडणवीस यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, मंगळवारी (ता. ३१) सह्याद्रीवर बैठक सुरू होती. तर सत्तेतील आमदार राजभवनावर आंदोलन करत होते. याचाच अर्थ आपल्या सरकारवरच तयांचा विश्वास राहिलेला नाही. मी गेल्या दोन आठवड्यापासून मागणी करत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावा आणि विधानसभा अधिवेशन बोलवण्याची मागणी मी सातत्याने केली आहे. लिंगायत, मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावर सर्वात अधिकवेळा बोलणारी मी एकटी खासदार आहे. (Mumbai News) चार पाच दिवस अधिवेशन होऊ द्या. प्रत्येक आमदाराला बोलण्याची संधी द्या. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येक आमदाराने स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे. लोकप्रतिनिधी सामान्यांचा आवाज म्हणून येत असतो, असं त्या म्हणाल्या.