Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : खोटारड्या, असंवेदनशील शासनासाठी जीवाची बाजी लावू नका… राज ठाकरे यांचे मनोज जरांगेंना पत्राद्वारे आवाहन!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 16:41

Mumbai News : मुंबई : सध्याची राजकीय व्यवस्था अतिशय भंपक आहे. तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात, त्याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. त्यांना तुमच्याकडून मत मिळाले की ते सगळी आश्वासने विसरणार, अशी यांची वृत्ती आहे. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लाऊ नका. तुमचं उपोषण तुम्ही तत्काळ थांबवा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे, अशी विनंती करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना लिहिले आहे. निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नका. आमचा पक्ष तुमच्यासोबत आहे, असे आवाहन देखील ठाकरे यांनी पत्राद्वारे केले आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण येणाऱ्या पिढ्यांना देशोधडीला लावणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं

जातीच्या नावाखाली मते मागायची, खोटी आश्वासने द्यायची हे सरकारचे उद्योग आहेत. आपण यांना भाबडेपणानी मत देतो. याचाच हे लोक गैरफायदा घेतात. ही माणसे निष्ठूर आहेत. कोण गेलं तरी यांना फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही जीव पणाला लावू नका. (Mumbai News) गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे क्लेषदायक आहे. आंदोलनाचा शेवट आपल्या समाजात विद्वेष पसरण्यात होऊ नये अशी इच्छा आहे. कारण एकदा का ते टोक गाठले की आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला, अशी भावना ठाकरे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश – बिहार व्हायला वेळ लागणार नाही. (Mumbai News) ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वांनी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही. उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

 

आपल्या मुला-मुलींना प्रगत शिक्षण, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणे शक्य आहे. फक्त त्यासाठी जागरूक रहायला पाहिजे. आपण संस्था उभ्या करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुलं शिकणार. आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार हे थांबवलं पाहिजे. (Mumbai News) या आपल्या शहरामध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठं आहेत हे ही आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहित नसतं. आपल्याला ह्या बाबतीत बरंच काम करायचं आहे म्हणून आत्ता उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका.

आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे. विरोधी पक्षात असताना तुमची मते मिळावित म्हणून आरक्षणाच्या वारेमाप थापा मारायच्या, आम्ही सत्तेवर येताच तत्काळ हा प्रश्न आम्ही मार्गी लावू म्हणून खोटं बोलणार आणि सत्तेत तुम्ही बसवलं की, कोण तुम्ही? कसलं आरक्षण म्हणून पुन्हा हेच उद्धटासारखे तुम्हाला विचारणार. या सर्वांची उत्तरे संविधानाच्या पानांत, संसद आणि विधानसभेच्या सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयात आहेत. मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं “विशेष अधिवेशन” भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. (Mumbai News) सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा. तोपर्यंत विनंती अशी की तुम्ही तुमचं उपोषण थांबवावे.

समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी एकत्रिपणे आपण काम करू. माझा पक्ष तुमच्या सोबत आहे. परंतु ह्या निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये, इतकी माझी इच्छा आहे. (Mumbai News) ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू. आपण महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. “सर्व मराठी एक” असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ.

पत्र संपविण्यापूर्वी राज ठाकरे यांनी “उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे,” अशी कळकळीची विनंती जरांगे पाटील यांना केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Mumbai News : जरांगे पाटील, तब्येतीची काळजी घ्या, आम्ही तुमच्यासोबतच आहोत… उद्धव ठाकरे यांचा फोनद्वारे संवाद; गरज पडल्यास…

Mumbai News : ‘महाराष्ट्र बंद’ ही अफवा; सोशल मिडियावरील संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे मराठा समाजाचे आवाहन

Mumbai News : सहमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यास तो बलात्कार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14

‘माझं लग्न जमत नाही, मला आयुष्य संपवायचंय’ नैराश्यातून पुण्यातल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 13 June 2026, 14:30

रांजणगाव एमआयडीसी मधील औषध कंपनीला २५ लाखांची खंडणीची मागणी

Saturday, 13 June 2026, 14:10

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर…

Saturday, 13 June 2026, 14:01

उरुळी कांचन मृतदेह विटंबना प्रकरणात चूक नेमकी कोणाची? खाकीची की पांढऱ्या कोटाची?

Saturday, 13 June 2026, 13:34
Next Post

Shirur News : मराठा आरक्षणासाठी शिरूर तालुक्यातील दोन तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांचे राजीनामे; पुढाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.