Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 July 2026, 21:12

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : सोशल मीडियावर खोटी ओळख निर्माण करून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, तिचा विश्वास संपादन करून व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणे आणि त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून बदनामीची धमकी देत मानसिक छळ केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस माहिती तंत्रज्ञान अधिनियम, पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता मधील माहिती तंत्रज्ञान अधिनियम बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण पॉक्सो तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम मधील संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सोशल मीडियावर खोटी ओळख तयार करून पीडित मुलीशी मैत्री केली. प्रेमाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केल्यानंतर वारंवार व्हिडिओ कॉल करून तिला अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले होते.

त्याचवेळी संपूर्ण प्रकाराचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते स्वतःच्या मोबाईलमध्ये जतन केले. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच आई-वडील व नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेचा सातत्याने मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तपासादरम्यान आरोपी आणि फिर्यादी दोघेही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपी हा विधीसंघर्षित बालक असल्याने त्याला ताब्यात घेऊन बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे करीत आहेत.

पोलीसांचे नागरिकांना आवाहन

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन ब्लॅकमेलिंग, धमकी किंवा अश्लील कृत्यांसाठी दबाव टाकला जात असल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.