Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 23 July 2026, 19:21

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेलची चोरी करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच बॅरलमध्ये पाणी भरून ठेवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक करत गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे.

या चोरीमुळे कंपनीचे सुमारे ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले असुन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज कंपनीच्या जनरेटरजवळ ठेवलेल्या बॅरलमधील ८०० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. चोरीचा संशय येऊ नये म्हणून आरोपींनी रिकाम्या बॅरलमध्ये पाणी भरून ठेवत कंपनीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासाची सूत्रे हाती घेत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षय प्रेमचंद देवडे रा. शिक्रापूर आणि अविनाश शंकर धुमाळ रा. रांजणगाव यांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत दोघांनीही डिझेल चोरीची कबुली दिली आहे.

 

तपासादरम्यान आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले असून आरोपी अक्षय देवडे याच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर अविनाश धुमाळ याच्यावर दरोड्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चोरीस गेलेले डिझेल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून या दोघांकडून आणखी अशाच प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार रोहीदास पारखे, नारायण मळेकर, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, राकेश मळेकर, नारायण वाळके आणि मच्छिंद्र निचीत यांनी केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मेट्रो मार्गिकेमुळे वाहतूक विस्कळीत; पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाची पाहणी

Friday, 28 August 2026, 15:05

राशीन देवस्थानच्या जमिनीतील मुरूम चोरीवर महसूल विभागाचा दणका ; पंचनामा झाला, आता कारवाईचा हातोडा कधी?

Friday, 28 August 2026, 14:47

येरवडा जेलमध्ये झाली ओळख, बाहेर येताच सुरू केला खेळ; बाहेर येताच 60 वर्षीय अधिकाऱ्याला 86 लाखांचा गंडा

Friday, 28 August 2026, 14:36

दररोज 500 रु परताव्याचं आमिष; पुण्यात डॉक्टर-व्यापारी दाम्पत्याने घातला तब्बल,33 लाखांचा गंडा!

Friday, 28 August 2026, 14:36

भोंगवली जीआयएस सबस्टेशनसाठी ग्रामस्थांचे नुकसान टाळून मार्ग काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Friday, 28 August 2026, 14:17

“मराठे चिडले तर… तळतळाट घेऊ नका!” जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; उद्यापासून तीव्र आंदोलनाची हाक

Friday, 28 August 2026, 14:16
Next Post

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp