Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोंगवली जीआयएस सबस्टेशनसाठी ग्रामस्थांचे नुकसान टाळून मार्ग काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 28 August 2026, 14:17

मुंबई : केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या नवीकरणीय ऊर्जेच्या ग्रीन कॉरिडॉरमधील भोर तालुक्यातून जाणाऱ्या ट्रान्समिशन लाइन व भोंगवली येथील प्रस्तावित जीआयएस सबस्टेशन उभारताना स्थानिकांच्या अडचणी समजून घेत स्थानिक नागरिकांचे कमीत कमी नुकसान होईल, असा सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांना दिले.

भोंगवली येथील प्रस्तावित जीआयएस सबस्टेशनबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. सबस्टेशनची जागा, विद्युत वाहिन्यांचे संरेखन आणि भविष्यातील वाढीव विद्युत भार यांचा विचार करून व्यवहार्य पर्याय तपासण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भोरमधील शेतकऱ्यांची विविध प्रकल्पांसाठी यापूर्वीच जमीन गेलेली असताना पुन्हा या प्रकल्पासाठी जमीन मागितली जात असल्याचे स्थानिक समितीचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे जवळपास 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुण्यासारख्या औद्योगिक जिल्ह्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आवश्यक सबस्टेशन्स उभारली नाहीत तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर वीजटंचाई निर्माण होऊ शकते.

पुणे जिल्ह्यातील विविध इतर तालुक्यांमध्येही सबस्टेशन्सची कामे सुरू आहेत. मात्र, भोरमधील नागरिकांच्या अडचणी शासनाने समजून घेतल्या असून, त्या सोडविण्यासाठी मार्ग काढला जाईल. या समस्येवर महापारेषण तसेच केंद्र सरकारचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा प्रकल्प असल्याने संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

 

सबस्टेशनच्या कामामुळे स्थानिकांचे कमीत कमी नुकसान कसे होईल, उपलब्ध जागेचा योग्य वापर कसा करता येईल आणि भविष्यातील विद्युत वाहिन्यांबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन कसे करता येईल, याचा विचार केला जाईल. ग्रीन कॉरिडॉरला विरोध केल्यास त्याचा परिणाम पुण्याच्या विकासावर होऊ शकतो. त्यामुळे स्थानिकांनीही सहकार्य करावे आणि सर्वांच्या हिताचा मध्यममार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, आमदार शंकर मांडेकर, भोर राजगड सब स्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांच्यासह ग्रामस्थ, अदानी पॉवरचे अधिकारी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील भडकले! ‘अंतरवालीत एवढा फौजफाटा कशासाठी?’ फडणवीसांना थेट सवाल; म्हणाले, ‘मराठ्यांसोबत कुस्ती खेळायचीय का?’

Friday, 28 August 2026, 19:18

दिशा सालियन प्रकरणात हायकोर्टाचा निकाल ‘राखीव’! सुनावणी पूर्ण, आता कोणता निर्णय येणार? सस्पेन्स शिगेला

Friday, 28 August 2026, 18:14

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राची मलेरिया विभागाकडून तपासणी; डेंग्यू-मलेरियाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना

Friday, 28 August 2026, 17:54

पुणे महापालिकेच्या तिजोरीत महसूल कमी का आला? समाविष्ट गावांतील कर आकारणीची होणार कसून तपासणी

Friday, 28 August 2026, 17:43

लोणी काळभोर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांना दणका; कुंजीरवाडीत हातभट्टीसह थेऊरमध्ये देशी-विदेशी दारू जप्त

Friday, 28 August 2026, 17:26

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! 2 परदेशी नागरिकांसह 3 जण एएनटीएफच्या जाळ्यात; अंमली पदार्थविक्रीप्रकरणी मोठी कारवाई

Friday, 28 August 2026, 17:17
Next Post

दररोज 500 रु परताव्याचं आमिष; पुण्यात डॉक्टर-व्यापारी दाम्पत्याने घातला तब्बल,33 लाखांचा गंडा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp