Mumbai News : मुंबई : मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला यासंदर्भात एक निनावी फोन कॉल आला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन कॉल आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे.
बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्यानंतर फोन करणाऱ्याकडून अधिक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न कंट्रोल रूममधील पोलीस कर्मचाऱ्यांनी केला. फोन करणाऱ्याबाबतीत इतर माहिती पोलीस गोळा करत आहेत. हा फोन नेमका कुठून आला याचा शोध पोलीस घेत आहेत.
अफवांच्या बाजारात उधाण
मुंबई पोलिसांना यावर्षी 100 हून अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे कॉलच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 99% आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणांमध्ये खोटी माहिती प्रसारित करणे अथवा धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होतात.
मंत्रालयात बॉम्ब
सप्टेंबर महिन्यात काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी 112 क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करुन देण्याची इच्छा केली व्यक्त केली.