मुंबई: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) 31 मार्च 2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 30 जून पर्यंत महाराष्ट्र परिवहन कार्यालयाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
सर्व सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे. असे आवाहन महाराष्ट्र परिवहन कार्यालयाकडून परिपत्रक जारी करून करण्यात आले आहे.