मुंबई: राज्य महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विभागातील विविध रिक्त पदांची भरती संबंधित आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार आहे. या यावेळी महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८८८२ पदांची भरती करण्यात येणार आहे.
‘या’ तारखेपासून होणार भरती
महिला व बालकल्याण विभागाची भारती प्रक्रिया १४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान होणार आहे. विभागातील मुख्य सेविका पदासाठी ही भरती होणार आहे. हही भरती सरळ सेवेच्या माध्यमातून होणार आहे.
तसेच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ या विभागातील रिक्त पदांसाठीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळं महिला उमेदवारांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे.