आपल्या आयुष्यातील कोणतेही नाते विश्वास, प्रामाणिकपणा आणि परस्पर समंजसपणावर अवलंबून असते. मात्र, काहीवेळा नात्यात दुरावा वाढू लागतो. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यात जर तुमची जोडीदार दुसऱ्याकडे आकर्षित होऊ नये जर असे तुम्हाला वाटत असेल तर काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.
बहुतेक संबंधांमध्ये, फसवणूक किंवा फटका बसण्याचे कारण म्हणजे संवादाचा अभाव. जर तुम्ही आणि तुमची जोडीदार तुमच्या भावना एकमेकांशी उघडपणे शेअर करत नसाल तर त्यामुळे नात्यामध्ये अंतर निर्माण होऊ शकते. तुम्ही दोघंही तुमच्या भावना, इच्छा आणि समस्या एकमेकांसमोर उघडपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. यामुळे गैरसमज कमी होतील आणि नाते घट्ट होईल.
अनेक वेळा तुमची जोडीदार तुमच्याशी वाद घालून दूर जाऊ शकते. कारण, त्यांच्या भावनिक किंवा शारीरिक अथवा आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. ही परिस्थिती टाळण्यासाठी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिला नात्यात काय हवे आहे आणि तिला काय आवडते ते विचारा.
प्रत्येक नात्यात विश्वास सर्वात महत्वाचा असतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर जास्त शंका घेत असाल तर ते तिला अस्वस्थ करू शकते. दुसरीकडे, जास्त स्वातंत्र्य दिल्यानेही नात्यात अंतर निर्माण होऊ शकते. समतोल राखणे, तिच्यावर विश्वास ठेवणे तितकेच आवश्यक आहे. एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल, हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे.