नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी HMD ने Barbie की-पॅड असणारा फोन नुकताच लाँच केला. नोकिया आणि एचएमडी स्मार्टफोन निर्माता कंपनी एचएमडीने बार्बी फोन आणला आहे. हा फोन गुलाबी रंगाचा असून, विशेषत: महिलांसाठी खास असा दिसून येत आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम वापरता येणार आहेत.
HMD या फोनच्या मागील बाजूस एक मोठे बार्बी ब्रँडिंग कोरलेले आहे. हे ड्युअल सिमला सपोर्ट करते. या फोनमध्ये MP3 प्लेअर आणि एफएम रेडिओसारखे फीचर्स आहेत. 1450 mAh बॅटरी देण्यात आली असून, यातून 9 तासांचा बॅकअप मिळू शकणार आहे. या फोनच्या किंमतीची माहितीही समोर आली आहे. या फोनची किंमत 7999 रुपये असणार आहे. हा फोन HMD च्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. HMD बार्बी फोनमध्ये 2.8 इंचाची QVGA स्क्रीन देण्यात आली आहे.
HMD बार्बी फोनमध्ये Unisoc T107 प्रोसेसर दिला गेला आहे. यात 64 एमबी रॅम आणि 128 एमबी इंटरनल स्टोरेज आहे. बार्बीचा हा फोन अगदी बेसिक आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोनचे स्टोरेज SD कार्ड टाकून 32 GB पर्यंत वाढवता येते. खास गोष्ट म्हणजे यात आणखी एक स्क्रीन आहे जी फोनच्या बाजूला आहे आणि 1.77 इंच आहे. हे मेकअप आणि टचअपसाठी आरशाप्रमाणे वापरली जाऊ शकते.