Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking: यशवंतच्या वार्षिक सभेत जमीन विक्रीचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 February 2025, 14:24

लोणी काळभोर, ता. २६ : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी थेऊन फाट्यावरील एका मंगल कार्यालयातील हॉलमध्ये पार पडली, त्यात आवाजी मतदानाने यशवंतच्या जमीन विक्रीसह सर्व विषय मंजूर करण्यात आले.

यशवंत सहकारी साखर (Yashwant Sahakari Sakhar karkhana, Theur) कारखान्याची 41 वी सर्वसाधारणसभा आज 26 फेब्रुवारीला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास  सुरू झाली. मागील १४ वर्षापासून बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल उभारण्यासाठी, कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्यासंदर्भातील मुख्य विषयावर चर्चा होणार असल्याने ही सभा महत्त्वाची समजली जात होती.  दरम्यान आज सकाळी साडेअकरापर्यंत सभा स्थळी शुकशुकाट होता, मात्र त्यानंतर सभासद जमायला सुरूवात झाली. पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.

आजच्या सभेत बहुमताने मंजूर झालेले निर्णय
यशवंत कारखान्याकडे असलेली बँकाची कर्जे, शेतकऱ्याची थकीत ऊसबील, कामगारांचे थकीत पगार, शासनाची विविध देणी, व्यापारी देणी व इतर देय देणी देणे. तसेच कारखान्याचा गाळप हंगाम २०२५-२६ सुरु करणे, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी कारखान्याच्या मालकीची बँकेकडे तारण असलेल्या ९९.२७ एकर जमिनीची विक्री कृषी उत्पन्न बाजर समिती, पुणे यांना करण्याबाबत निर्णय झाला. तसेच ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचारविनिमय करण्यात आले.

सन 2010 साली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करण्यात आला. सन २०१२ ते २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे विषय वाचून कायम केले. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १४ (२) अन्वये व ९७ व्या घटना दुरूस्तीप्रमाणे सुधारित कायदा व नियमास अनुसरून आदर्श उपविधी दुरूस्ती कारखान्यास लागू असल्याने स्वीकारून त्यास मान्यता देण्यात आली.

कारखान्याची २०२३ ते २०२४ अखेरची प्रशासकीय समितीने (यशवंत सहकारी कारखाना) सादर केलेला ताळेबंद व नफा तोटा पत्रके स्वीकारणे, जिल्हा विशेषलेखा परीक्षक, वर्ग-१ सहकारी संस्था, सातारा यांच्याकडून २०२३ ते २०२४ या वर्षाच्या लेखा परीक्षण अहवाल स्वीकारून, दोष दुरुस्ती अहवाल सादर करणे, सन २०२५-२०२६ वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या भांडवली व महसूली अंदाजपत्रकाची नोंद घेणे, तसेच सन २०२५-२०२६ सालाकरिता भांडवल उभारणीस संचालक मंडळास अधिकार देणे, हे ही ठराव मंजूर झाले.

सन २०२४ वर्षाकरिता अंतर्गत हिशोब तपासणीस यांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे. कारखान्याच्या ड्यु-डिलीजन्स अहवालावर विचार-विनीमय करून धोरण ठरविणे. कारखान्याच्या जून्या साखर प्लँटबाबत व नवीन आधुनिक साखर प्लँट, आसवणी प्लँट व को-जनरेशन प्लँट उभारणी करणे, याबाबत संचालक मंडळास अधिकार देणे, हेही ठराव मंजूर करण्यात आले.

तसेच संस्थेच्या नांवातील बदला बाबतचा संचालक मंडळाने मांडलेला प्रस्तावास मान्यता देऊन, त्यास शासन मान्यता घेणे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ नुसार सहकारी साखर कारखान्यांच्या सभासद भागाची दर्शनी किंमत 15 हजार रुपयेप्रमाणे झालेची व त्यानुसार अंमलबजावणी करणेची नोंद घेण्यात आली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32
Next Post

तक्रारवाडी येथे जिल्हा परिषद शाळा वर्गखोलीचे भूमिपूजन संपन्न..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.