लोणी काळभोर : येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी सार्थक सुरेश कोरे याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 244 गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रतिक अरविंद राठोड याने 300 पैकी 210 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली. नुकत्याच जाहीर झालेल्या अंतरिम निकालात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सार्थक सुरेश कोरे याने 244 गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर आणखी 21 विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवून शाळेचा झेंडा उंचावला आहे.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी
1. सार्थक सुरेश कोरे – 244
2. आरोही नंदकुमार साळुंखे – 218
3. कार्तिक रंगनाथ ढगे – 206
4. वीर विलास पवार – 196
5. स्वरा प्रदीप पाटील – 190
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी
1. प्रतिक अरविंद राठोड – 210
2. अक्षदा अरुण घुगे – 176
3. सिफा मोहम्मद सय्यद – 146
दरम्यान, या यशामागे विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य आहे. संस्थेचे सहसचिव सीताराम गवळी सर, शाळेच्या प्राचार्यापोर्णिमा शेवाळे व शिष्यवृत्ती विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत सातत्याने मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.