दिल्ली: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात 8 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर 2 गंभीर जखमी आहेत. ही घटना शनिवारी घडली. हरियाणा इथल्या नूंह परिसरात फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे वरील इब्राहिमबास गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या पिक-अप वाहनाने साफसफाईच्या कामात गुंतलेल्या कामगारांना धडक दिली. स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.








