Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 November 2026, 8:33

पुणे : शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत स्वच्छता आणि साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील प्रसिद्ध हॉटेल्ससह दोन मोठ्या ऑनलाइन कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नारायण सरकटे, तसेच सतीश हाके, प्रिया राजगोळकर, दीपाली घोडके, पूजा बागडे आणि सुप्रिया जगताप या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली.

सिंहगड रस्ता परिसरातील ॲमेझॉन (गजानन इन्व्हेंटरीज) आणि बिग बास्केट (इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट) यांच्या गोदामांची तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आले. या ठिकाणी मुदत संपलेले लाडू, पेढे, केक, पाव, दुधाचे रस्क आणि चटणी असे पदार्थ आढळले. गोदामात सर्वत्र घाण आणि कीटकांचा वावर होता. डब्यांवर धूळ व बुरशी साचली होती, तुपाच्या डब्याचे झाकण तुटलेले होते, तर तेलाची गळती सुरू होती. शीतगृहातही अस्वच्छता आढळली. याशिवाय, खाण्याच्या वस्तू आणि इतर बिगरखाद्य सामान एकत्र ठेवण्यात आले होते. अनेक पाकिटांवर उत्पादनाची आणि वापरण्याची अंतिम तारीख नमूद नसल्याने दोन्ही कंपन्यांचे परवाने रद्दबातल ठरवण्यात आले आहेत.

या मोहिमेअंतर्गत कॅम्प आणि महात्मा गांधी रस्ता परिसरातील एकूण 20 उपाहारगृहांची कसून पाहणी करण्यात आली. यातील 8 हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात प्रचंड घाण, कीटकांचा वावर, कृत्रिम रंगांचा वापर आणि प्रमाणाबाहेर चव वाढवणारे घटक आढळून आले. त्यामुळे त्यांचे परवाने तातडीने स्थगित करण्यात आले आहेत.

यामध्ये मेट्रो रेस्टॉरंट, सहाना व्हेज रेस्टॉरंट, शिवाय कॉर्नर, ग्रँड दिल्ली दरबार, राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार, द बर्गर बार्न कॅफे, महादेव फूड्स आणि फिरोज केटरर्स या आस्थापनांचा समावेश आहे. या कारवाईमुळे नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Sunday, 22 November 2026, 8:33

पुण्यात भाजपला खिंडार! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार?

Sunday, 22 November 2026, 8:05

स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीत पीडितेला अश्रू अनावर! न्यायालयातील कामकाज तहकूब; कोर्टात नेमकं काय घडलं?

Sunday, 22 November 2026, 7:48

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30

आजचा रविवार राशींसाठी ठरणार लकी! शुभ योगांचा महासंयोग; राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर!

Sunday, 22 November 2026, 7:13

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp