Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 November 2026, 23:05

पुणे : महापालिकेच्या (PMC) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील पदभरतीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे. सेवेत कायम करण्याचे आमिष दाखवून 11 कंत्राटी डॉक्टरांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये उकळण्यात आले असून, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या फसवणुकीच्या जाळ्यात महाविद्यालयातीलच तीन डॉक्टरांनी मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

या प्रकरणात डॉ. नानासाहेब भांगरे, डॉ. इरफान मुल्ला आणि डॉ. हेमंत वैद्य यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. कंत्राटी डॉक्टरांकडून रोख रक्कम गोळा करून ती पुढे पोहोचवण्याची जबाबदारी या तिघांनी पार पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे हे तिघेही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

महापालिकेने 4 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या महाविद्यालयात सुरुवातीला कंत्राटी तत्त्वावर नेमणुका केल्या होत्या. मागील वर्षी येथे MD आणि MS पदवीधारक 28 प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली. याच संधीचा गैरफायदा घेत कार्यरत कंत्राटी डॉक्टरांकडे पैशांची मागणी करण्यात आली.

मात्र, पैसे देऊन वर्ष उलटले तरी 11 जणांची नियुक्ती झाली नाही. आपली रक्कम परत मागितल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. पीडितांनी सुरुवातीला महाविद्यालयाच्या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असणाऱ्या महापौरांकडे दाद मागितली, परंतु तिथून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी ACB कडे धाव घेतली.

ACB चे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत सर्व तक्रारदारांचे सविस्तर जबाब नोंदवून घेतले जातील. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पुणे महापालिका आयुक्तांची रीतसर परवानगी घेण्यात येणार आहे. या गैरव्यवहाराचे मुख्य सूत्रधार कोण आणि गोळा केलेले कोट्यवधी रुपये नेमके कोणाकडे गेले, हे आता पोलीस तपासातूनच स्पष्ट होईल.
—-

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp