Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 November 2026, 21:28

बारामती: शहरातील एमआयडीसी भागातील शिवशंभोनगर परिसरात आज सायंकाळी गोळीबाराचा थरार घडला. येथील स्थानिक उद्योजक राजन कोळेकर यांच्या निवासस्थानाजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला लक्ष्य करत अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेले नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शिवशंभोनगर येथे राजन कोळेकर यांचे घर आहे. त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीजवळ काही अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी अचानक बंदुकीतून 2 राऊंड फायर केले. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने आसपासचे रहिवासी घराबाहेर आले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

हा प्रकार घडला त्या नेमक्या वेळी वाहनामध्ये कोणी बसले होते का, किंवा स्वतः उद्योजक राजन कोळेकर त्या ठिकाणी उपस्थित होते का, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच, या गोळीबारामागे हल्लेखोरांचा नेमका काय उद्देश होता आणि हा हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. व्यावसायिक वादातून हा प्रकार घडला की अन्य काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू केली असून, अज्ञात आरोपींचा माग काढण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27

लोणी काळभोरच्या वैभवची धावपट्टीवर दमदार भरारी! 3 हजार मीटरमध्ये पटकावले कांस्यपदक

Saturday, 21 November 2026, 20:16

पुणे जिल्हा परिषदेचे 25 गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

Saturday, 21 November 2026, 20:00

हवेली खरेदी-विक्री संघावर आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व! 19 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय; परिवर्तन पॅनेलला केवळ दोन जागांवर समाधान

Saturday, 21 November 2026, 19:00
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp