Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली खरेदी-विक्री संघावर आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व! 19 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय; परिवर्तन पॅनेलला केवळ तीन जागांवर समाधान

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 21 November 2026, 19:00

उरुळी कांचन :हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या अत्यंत चुरशीच्या संचालक मंडळ निवडणुकीत सहकारमहर्षी आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवत सहकार क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. संस्था प्रतिनिधी गटातील 10 जागांपैकी तब्बल सात जागांवर, तर वैयक्तिक सभासद प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, इतर मागास प्रवर्ग, भटक्या-विमुक्त जाती प्रवर्ग आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील सर्वच्या सर्व नऊ जागांवर विकास पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली. अशा प्रकारे एकूण 19 पैकी 16 जागांवर विजय मिळवत विकास पॅनेलने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. तर प्रतिस्पर्धी आण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनेलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागले होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत विकास पॅनेलने बहुतांश जागांवर विजय मिळवत विरोधी पॅनेलला मोठा धक्का दिला. मात्र, विकास पॅनेलचे प्रदीप खंडू आहिरे आणि तेजस नंदकुमार कोकाटे यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, परिवर्तन पॅनेलचे हवेली पंचायत समितीचे विद्यमान सदस्य कृषीराज ऊर्फ मनोज चौधरी आणि खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र खांदवे आणि तुषार कुटे यांनी विजय मिळवला.

दरम्यान, विविध प्रवर्गांत मिळालेल्या घवघवीत यशामुळे विकास पॅनेलची संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली आहे. संस्था प्रतिनिधी गटापासून ते वैयक्तिक सभासद आणि राखीव प्रवर्गांपर्यंत मतदारांनी विकास पॅनेलला कौल दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या आगामी कारभारात विकास पॅनेलची भूमिका निर्णायक ठरणार असून, संघाच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार, याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सहकारमहर्षी आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार

संस्था प्रतिनिधी : कल्याण अंकुश शिंदे, संजय सोपान गायकवाड, प्रकाश अमृत सावंत, युवराज पंडितराव कांचन, गुलाब भागुजी चौधरी, बाळासाहेब शिवाजीराव पोकळे, अश्विनी भोरडे

वैयक्तिक सभासद प्रतिनिधी : प्रशांत दत्तात्रय काळभोर, महेंद्र पाटीलबुआ दांगट, मधुकर रामदास घुले, शेखर सहदेव मस्के.

महिला प्रतिनिधी : सुनीता संदीप धुमाळ, सुरेखा अनंता भाडळे.

इतर मागास प्रवर्ग : संजय अमृतराव सातव.

भटक्या-विमुक्त जाती प्रवर्ग : मल्हारी दत्तात्रय केसकर.

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : सत्यवान दगडू गायकवाड

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27

लोणी काळभोरच्या वैभवची धावपट्टीवर दमदार भरारी! 3 हजार मीटरमध्ये पटकावले कांस्यपदक

Saturday, 21 November 2026, 20:16

पुणे जिल्हा परिषदेचे 25 गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

Saturday, 21 November 2026, 20:00

हवेली खरेदी-विक्री संघावर आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व! 19 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय; परिवर्तन पॅनेलला केवळ तीन जागांवर समाधान

Saturday, 21 November 2026, 19:00
Next Post

पुणे जिल्हा परिषदेचे 25 गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp