सुरेश घाडगे
परंडा : सकल मराठा समाजाला शिक्षण व नौकरीत आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यासाठी (ता. ८) नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने परंडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे .सकल मराठा समाजाच्या महामोर्चास परंडा तालूका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने दि ५ नोव्हेंबर रोजी पाठिंब्याचे पत्र देण्यात आलेले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांनी सकल मराठा समन्वय समीती यांच्याकडे लेखी पत्र देऊन पाठीबा दिला आहे.
यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष फकीरा सुरवसे, उपाध्यक्ष जयराम साळवे, आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, संपर्क प्रमुख दादा सुरवसे, संजिवन भोसले, उत्तम ओव्हाळ, हरीभाऊ अडगळे, बाबा शिदे, फुलचंद ओव्हाळ, विलास भोसले, दिपक ठोसर, सचिन राऊत, बाबा गायकवाड, हनुमंत प्रतापे, धनंजय यशवद, सागर रंदिल, निलेश गायकवाड, रामचंद्र दाभाडे यांच्यासह मराठा आरक्षण समन्वय समीतीचे सदस्य उपस्थीत होते.