पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने ग्राहकांना फसवणुकीच्या कारवायापासून वाचवण्यासाठी आणि गॅसची संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी ‘माय एमएनजीएल’ अँप लॉन्च केले आहे. या अँपद्वारे ग्राहकांना आता डिजिटल फसवणीपासून संरक्षण मिळण्यासह सर्व गॅस सेवा एकाच ठिकाणी सुलभ उपलब्ध होणार आहेत.
अलीकडेच एमएनजीएलच्या नावाने फसवणूक करण्याकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात असून त्यावर आळा घालण्यासाठी हे एक सुरक्षित,अधिकृत आणि वापरण्यास सुलभ असा उपाय ठरणार आहे. फसवणुकीच्या घटना थांबवण्यात म्हणून एमएनजीएलने विविध उपयोजना केल्या आहेत. त्या योजना एसएमएसद्वारे आणि सोशल मीडियावर देखील शेअर केल्या आहेत.
गेले काही दिवसापासून ग्राहक फसवणूकला बळी पडत आहेत त्यामुळे आपली जनजागृती अधिक तीव्र करत एमएनजीएलने ” माय एमएनजीएल ” नावाचा एक पूर्ण सुरक्षित आणि विश्वासार्ह ॲप ग्राहकांच्या सेवेत आणला आहे.