पुणे : गेल्या काही दिवसापासून ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता महापालिका पाणीपुरवठा विभागाने विद्युत मोटारीने पाणी खेचण्यावर कारवाई केली आहे. या विभागाकडून वेगवेगळ्या भागातील 42 विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरातील चिंचवड बळवंतनगर शिवनगरी भागात 21 विद्युत पंप, रहा टणी परिसरातील अमृतवेल कॉलनी भागातील थेट नळाला जोडलेले 11 विदयुत पंप,चिखली मोरे वस्ती भागातील भावेश्वरी व श्रीकुंज कॉलनी भागात 10 विद्युत पंप जप्त करण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी वाढलेली असताना पाणी वापरावर नियंत्रण आणून सर्व नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवणे महत्त्वाचे आहे त्यासाठी शहरात वाढलेला बेकायदा पाणी वापर कमी करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शहरात तपासणी करणे,विद्युत मोटारी जप्त करणे,बेकायदा नळ जोडावर कारवाई करणे आणि नळजोड अधिकृत करण्यासाठी मोहीम राबवत आहे.