सुरेश घाडगे
परंडा : मराठा आरक्षण सकल मराठा महामोर्चासाठी परंडा येथे शिक्षक पतसंस्था सभागृहात सकल मराठा महिलांची रविवारी (ता. ०९) बैठक पार पडली.
या बैठकीत महिला तसेच मुलींचाही सहभाग वाढविणे व मोर्चा यशस्वी करणे आदि बाबत बैठकीत चर्चा झाली. आरक्षणाची गरज व ते मिळविणे यावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
८ नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चात शहरी तसेच ग्रामिण भागातून मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा महिला समन्वयक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.