Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आमरण उपोषण सुरु असतानाच, भोकरदन तालुक्यातील महिला रणरागिणी शनिवारी (ता.२८) रस्त्यावर उतरल्या होत्या. मराठा समाजाला लवकरात लवकर सरकारने आरक्षण द्यावे, हि मागणी करत महिला वर्गानी आक्रोश केला.
संताप व्यक्त
एल्गार मोर्चा काढीत सकल मराठा समाजाच्या महिलांनी मराठवड्यातील मराठा आमदार, खासदारांना पोस्टाद्वारे बांगड्या, साडी चोळी पाठवून संताप व्यक्त केला आहे. संताप व्यक्त करतच, त्यांनी राज्य सरकारचा निषेध केल्याचे या ठिकाणी आढळून आले. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात व त्यांना पांठिबा देत, हा मोर्चा काढल्याचे दिसून आले.
मराठा समाजाला न्याय मिळवा; यासाठी राज्यातच नव्हे; तर देशात गाजलेल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली सराटी येथील मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आरक्षण या मागणी साठीचे आमरण उपोषण पुन्हा सुरू झाले असून, उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना पाठींबा व मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी शनिवारी भोकरदन तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या महिलांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मुख्य रस्त्याद्वारे आरक्षणासंदर्भात विविध घोषणा देत एल्गार मोर्चा काढला आहे.
यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात मौन बाळगून असलेल्या सर्वपक्षीय मराठा आमदार व खासदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सर्वपक्षीय मराठा आमदार व खासदार यांना साडी, चोळी, बांगड्या, टिकली, हळदी, कुंकू असलेले पार्सल पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. दुपारी एक वाजता पोस्ट ऑफिस परिसरात राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता करण्यात आली आहे.
महिला वर्गानी एल्गार मोर्चा काढत मराठा आंदोलना ला पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे; या मागणी साठी महिला रणरागिणी रस्त्यावर उतरल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले.