नागपूर: नागपूर येथे 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध मागण्यांसाठी विधानभवनावर 33 हून अधिक मोर्चे आणि आंदोलने धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Vidhansabha Winter Session)

विविध संघटनांनी या अधिवेशनासाठी जोरदार तयारी केली असून, या 33 संघटनांनी आंदोलनांसाठी पोलिसांकडे अधिकृत परवानग्या मागितल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 संघटनांनी धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे.
तर, 17 संघटनांनी साखळी उपोषणासाठी अर्ज केले आहेत. दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती तसेच चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा येथील संघर्ष समिती यांसारख्या प्रमुख संघटनांनीही मोर्चे काढण्याची परवानगी मागितली आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर पाच मोर्चे धडकणार असून, ही आंदोलनांची संख्या अधिवेशनाच्या काळात पन्नासच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: मोठी अपडेट! पुणे विभाग पदवीधर मतदार नोंदणीत मोठी घट; 4.20 लाखांवरून संख्या थेट 2.72 लाखांवर
परळी येथील आयटीआय विद्यार्थी आक्रमक
दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळी येथील गोपीनाथ मुंडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थी एका वेगळ्या कारणास्तव आक्रमक झाले आहेत. येथील संस्थेतील एक शिक्षिका व्यवस्थित शिकवत नसल्याचा आणि विद्यार्थ्यांना धमकावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संबंधित शिक्षिकेचे तातडीने निलंबन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
प्राचार्य आणि इतर अधिकाऱ्यांनी या गंभीर तक्रारीकडे लक्ष दिले नाही आणि प्रतिसाद दिला नाही, अशी नाराजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
या दोन्ही घडामोडींमुळे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: जीव घ्यायला आलेल्या गुंडाला थेट यमसदनी धाडले; कामशेतजवळ झालेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू






