Pune Crime: पुणे : पुणे–नाशिक महामार्गावरील खेड घाट परिसरात चालत्या एसटी बसमध्ये काही गुंडांनी दहशत माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसच्या चालक (Driver beaten up) आणि वाहकाला मारहाण करणारा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीदरम्यान बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, मंचर येथील डेपोची एसटी बस खेडहून मंचरकडे जात होती. याच वेळी काही तरुणांनी आपली थार गाडी रस्त्यात आडवी उभी करून बसला अडवले. बस चालकाने बस थांबवली आणि गाडीतून दोन ते तीन तरुण तात्काळ बसमध्ये शिरले आणि कोणतीही चौकशी न करता थेट चालक आणि वाहक यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.
चालत्या बसमध्ये घुसून केलेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अचानक घडलेल्या या प्रकाराने अनेक प्रवासी भयभीत झाले होते आणि भररस्त्यात अडकून पडले.
या हल्ल्यामुळे काही काळ बस मध्ये थांबवावी लागली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन आरोपी तरुणांचा शोध सुरू केला आहे. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आरोपींविरुध्दात गुन्हा दाखल करण्यास प्रतिक्रिया दिल्या. अद्याप मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्या नसल्यामुळे बस डेपो व्यवस्थापनांनी संताप व्यक्त केला आहे.






