बापू मुळीक
सासवड : प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सात पैकी सहा गावातील नागरिक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. यावेळी विमानतळासाठी घेतल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला कसा आणि किती दिला जाणार आहे. या प्रकल्पामुळे आम्ही विस्थापित होणार आहे. आत्तापर्यंत विमानतळ प्रकल्पाच्या केवळ चर्चा सुरू होत्या. मात्र आमच्याशी सरकार अद्याप पर्यंत चर्चा करीत नाही. भूसंपादनापूर्वी आमच्याशी चर्चा करण्याची शिष्टमंडळाने एक प्रकारे विनंती केली.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाची वाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी या सहा गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळांनी डुडी यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी जमीन मालकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांचे गारहाणे मांडले. यात अपवाद असा की, पारगाव मेमाने येथील शेतकरी आले नव्हते. आम्ही अल्पभूधारक प्रकल्पाला एक प्रकारे आमचा विरोध; पुरंदर विमानतळासाठी आमची सात गावी विस्थापित होणार आहेत. शेती हे आमचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. प्रकल्पासाठी जमीन गेल्यावर आम्हाला साधन कोणते, नोकरी उपलब्ध होणार नाहीत, यासारख्या विविध तक्रारी, समस्या शिष्ट मंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. तर पुरंदर तालुक्यातील या सात गावांमध्ये अंजीर पिकाचे मोठे उत्पादन घेण्यात येत आहे. सर्वाधिक उत्पादन हे पुरंदर तालुक्यात होत आहे. त्यामुळे आमचे नुकसान होत असून, आम्ही अल्पभूधारक आहोत, त्याची संख्या जास्त आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधत, आमचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे, त्यांनी एक प्रकारे स्पष्ट केले.
भूसंपादनापूर्वी जमीन मालकांशी चर्चा करणार ; पुरंदर विमानतळ झाल्यानंतर तुमच्या अंजीराच्या उत्पादनासाठी निर्यातीचा मार्ग खुला होईल, विमानतळाच्या माध्यमातून पुरंदरच्या अंजिराची जगभर प्रसिद्धी करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्ट मंडळाला दिले आहे. यासंदर्भात प्रकल्पासाठी जमीन संपादनापूर्वी शेतकरी जमीन मालकांशी चर्चा केली जाईल. शेतकऱ्यावर कोणतेही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याचा मोबदला कसा आणि कशा पद्धतीने दिला जाईल, पैशाची विभाजन कशी होईल याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना एक प्रकारे आश्वसत केले.
दरम्यान अधिकारी प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत,शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादना आदी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पुरंदर तालुक्यातील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाणार आहेत. तेथील शेतकरी, जमीन मालकांशी थेट चर्चा करणार आहेत. प्रकल्पाबाबत माहिती दिली जाणार आहे. प्रकल्पामुळे काय होईल, त्यासाठी भूसंपादन किती महत्त्वाचे आहे मोबदला कशा पद्धतीने मिळेल. स्वच्छने दिल्यास मोबदला किती आणि विरोध केल्यास सकक्तीने संपादन करून मोबदला किती मिळू शकेल. याबाबतची माहिती या बैठकीत शेतकऱ्यांना दिली जाणार असून, ही माहिती शेतकऱ्यांना अधिकारी देणार आहेत असे त्यांनी सांगितले.