पुणे : महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या तावडीत आहे. याच दरम्यान आता कोरटकरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये तो आलिशान कार सोबत दिसत आहे. या कारच आता पुणे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत कोरटकर यांने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या फोटोमधील ती कार पिंपरी – चिंचवडमधील बांधकाम व्यवसायिक तुषार कलाटेंकडे असल्याची माहिती समोर आली आहे. ही कार मुळशी तालुक्यातील तुषार कलाटे यांच्या फार्महाऊसवर उभी असल्याचे एका व्हिडीओत स्पष्ट झाले आहे. तसेच, WB-02-AB-123 या क्रमांकाच्या रोल्स रॉईस सोबत तुषार कलाटे यांचे काही फोटोही समोर आले आहेत.दरम्यान कोर्टकरला कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. यांचदरम्यान कारचे गूढ उलगडले आहे.
दरम्यान आलिशान कारचे प्रशांत कोरटकर यांने फोटो आणि व्हिडिओ स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.मात्र आढळून आलेली कार नेमकी कोणाची हे सांगण्यास प्रशांत कोरटकरने नकार दिला आहे.