दौंड, (पुणे) : शेतात उसाला पाणी देण्याच्या पाळीवरून झालेल्या भांडणात दोघांना लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. गुरुवारी (ता. 24) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लोणारवाडी (ता. दौंड) गावच्या हद्दीत जमीन गट क्रमांक 121 मधील शेतात घडली. याप्रकरणी दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापु पोपट बरकाडे, व अभिषेक बापु बरकाडे (रा. दोघेही मलठण, ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुभाष पोपट बरकाडे (वय 40, धंदा शेती, रा. मलठण, ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष बरकाडे व त्यांचा मुलगा सागर ऊस पिकाला पाणी देण्यासाठी गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जावुन पाणी देत होते. यावेळी भाऊ बापु बरकाडे व त्याचा मुलाग अभिषेक तेथे आले होते. यावेळी अभिषेक आम्हाला म्हणाला की, दर वेळेस तुमची पाळी कसे असते त्यावरुन सुभाष बारकडे म्हणाले की,माझी दोन दिवस पाळी आहे ती पाळी झाली की पाणी तु घे.
यावेळी भाऊ पोपट व त्याचा मुलगा अभिषेक यांनी शिवीगाळ सुरु केली. त्यावेळी दोघांनीही शिव्या देण्यास सुरुवात केली. शिव्या का देतो असे विचरताच बापु बरकाडे यांनी कांद्याच्या वखारी जवळ पडलेला गज हातात घेवुन पायावर मारहाण केली. तर त्याचा मुलगा अभिषेक याने माझा मुलगा सागर पकडुन ठेवले होते.
दरम्यान, बापु बरकाडे याने उजव्या पायाच्या नडगीवर, गुडघ्यावर लोखंडी गजाने मारहाम करुन जबर दुखापत केली. मोठ्याने आरडा ओरडा केल्यानंतर बापु व अभिषेक बरकाडे यांनी हाताने लाथाबुक्काने सुभाष व मुलगा सागर यांना मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन तेथुन निघुन गेले. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 117(2), ११५(२), ३५१(२), ३५२, व अॅट्रॉसिटी कायद्यातील कलम ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक 305/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार संतोष शिंदे करीत आहेत.