Big News : मुंबई : मराठा आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीयांची बैठक सुरू असतानाच मंत्रालयात सर्वपक्षीय आमदारांकडून आंदोलन केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी या आंदोलक आमदारांनी मंत्रालयाच कुलूप लावले आहे. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी आंदोलक आमदारांनी केली आहे. या आमदारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वेळी हे आमदार आक्रमक झाले. आम्ही आमच्या समाजासाठी भूमिका घेत आहोत. यात चुकीचं काय आहे? आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा आरक्षण द्या, अशी मागणी आमदार म्हणाले.
आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा आरक्षण द्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंत्रालयात आंदोलन सुरू आहे. राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालय परिसरात आंदोलनाला बसले होते. सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घ्यावी. सरकारसमोर बाजू मांडावी, (Big News) अशी मागणी सर्वसामान्य मराठा बांधव करत आहेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी हे आंदोलक करत होते. आजच्या दिवसभरात सरकारने आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा जलत्याग करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांचे आंदोलन लक्ष वेधून घेत होते.
दरम्यान, आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत. (Big News) त्यामुळे या बैठकीतून काय समोर येते. मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांचा मंत्रालयासमोर आक्रोश; अधिवेशन बोलवण्याची मागणी
Big News : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच… मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात