अजित जगताप
Ambedkar Jayanti 2023 | वडूज : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी घेतला. महात्मा फुलेंचा आदर्श डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला आणि डॉ. आंबेडकर यांचा आदर्श लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी घेतला हे महापुरुष वेगवेगळ्या जातीचे असले तरी त्यांचा विचारांचा वारसा एकच होता हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे याच्या जाणिवा तुम्हा आम्हाला असल्याच पाहिजे असे प्रतिपादन वडूज नगरंचायतीच्या नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे यांनी केले.
वडूज नगरंचायतीच्या वतीने आज सकाळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी वडूज नगराध्यक्षा मनिषा काळे, उप नगराध्यक्ष मनोज कुंभार, नगरसेविका शोभा बडेकर , शोभा वायदंडे, रेश्मा बनसोडे,राधिका गोडसे, आरती काळे, रेखा माळी, रोशना गोडसे, नगरसेवक बनाजी पाटोळे, सुनिल गोडसे, अभय कुमार देशमुख, तुषार बैले, अमोल गोडसे, अनिल माळी, प्रतिक बडेकर, तानाजी वायदंडे , रविंद काळे प्रशासकीय अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते
आज विश्वरत्न ,भारतरत्न शिल्पकार माणसाला माणसाचा अधिकार देणारे “महामानव” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना डॉ. आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देवून सौ गोडसे म्हणाल्या, शब्दांना आकार उकार देण्याची कितीही पत्र वाटली तरी ती जिवंत होत नाहीत त्याचप्रमाणे अस्थिर झालेल्या समाजाच्या बोधक संवेदना कितीही जिवंत केल्या तरी त्या जिवंत होत नाहीत ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार शिल्पा वर हजारो घाव घालतो आणि एक शिल्प निर्माण करतो असेच काही शिल्पकार आपल्या समाजामध्ये देखील असतात त्यांचा जगणं किंवा मरण हे समाजासाठी असतं.
अशा महापुरुषांचा समाजाचा जगणं असतं ते जगण्यासाठी किंवा मरण्यासाठी कधी संघर्ष करत नाहीत तर अशी माणसं संघर्ष करतात जगण्या मरण्यातील उरण्यासाठी आणि त्यांचं हे पूर्ण संघर्षातून आलेलं असतं आणि अशा संघर्षातून साकारलेले समाजाचे शिल्पकार म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.
महापुरुषांचा आदर्श लक्षात ठेवून एक विचार वारसा जपली पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला समाजामध्ये राहता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे आणि लढता ही आलं पाहिजे हे या जयंतीनिमित्त आज मी सांगू इच्छिते…
आले किती गेले किती उडून गेला भरारा,
आले किती गेले किती उडून गेला भरारा,
संपला नाही आणि संपणार ही नाही,
असा आहे माझ्या भिमाचा दरारा …
असे ही शेवटी सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांनी सागितले .