नवी दिल्ली: भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे मा. प्रधानमंत्री महोदय यांचे शुभहस्ते पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता वितरण कार्यक्रम ऑनलाईन प्रणाली द्वारे संपन्न झाला.
देशभरातल्या शेतकऱ्यांना सहायता व्हावी म्हणून नरेंद्र मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना चालू केली होती. सध्या या योजनेअंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना वर्षासाठी ६ हजार रुपये दिले जात आहेत. देशभरातील असंख्य शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून १९ व्या हफ्त्याच्या प्रतिक्षेत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत १९ व्या हफ्त्याच्या पैशांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान यांनी दूरस्थ पद्धतीने १ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये २२ कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.
या किसान सन्मान कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागलपुर बिहार येथून पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता वितरण करून सर्वांना संबोधित केले.