सुरेश घाडगे
परंडा : जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि .११ डिसेंबर २०२२ रोजी सोनारी येथील भैरवनाथ शुगर या साखर कारखाना स्थळी (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) येथे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आला आहे. अशी माहिती भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी शनिवार ( दि. ८ ) दिली.
कोरोना काळातील दोन वर्षे वगळता गेल्या वीस वर्षापासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. भैरवनाथ शुगरचे सोनारी, विहाळ, लवंगी, आलेगाव, वाशी याठिकाणच्या कारखान्यांच्या कार्यालयांसह जयवंत मल्टीस्टेच्या सर्व शाखांमध्ये नाव नोंदणी सुरू आहे.
दरम्यान, नाव नोंदणी करताना वधू-वरांच्या वयाचे पुरावे देणे आवश्यक आहे. वधूस शालू, मणी-मंगळसूत्र तर वरास सफारी, टोपी-टॉवेल आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींना भोजन दिले जाणार आहे. या विवाह सोहळ्याच्या अनुषंगाने पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे .असे सावंत यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा कारखान्याचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत, अॅड. केशव सावंत, कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत, संजय ढेरे, नाना शेलार उपस्थित होते.