पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सिंधुदुर्ग अंगणवाडी भरती सुरु झाली आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बारावी पास उमेदवारांनाही यामध्ये नोकरीची संधी मिळू शकणार आहे.
सिंधुदुर्ग येथे अंगणवाडी विभागात अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सिंधुदुर्ग येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 372 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कम्पांऊड, जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका.
– रिक्त पदे : 372 पदे.
– नोकरीचे ठिकाण : सिंधुदुर्ग.
– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण.
– वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sindhudurg.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.