Job News : पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी आहे ही गुड न्यूज. कारण लातूर जिल्हा परिषदेत विविध पदांवर भरती केली जात आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद, लातूर येथे भरती प्रक्रिया राबवली जात असून, यामध्ये विविध अशा 12 पदांवर भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी लातूर येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
पदाचे नाव : IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती.
एकूण रिक्त पदे : 12 पदे.
नोकरीचे ठिकाण : लातूर.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर, 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – उमेद, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (MSRLM), जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, लातूर.
कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://zplatur.gov.in/ वरून घेता येऊ शकणार आहे.