पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पगारही चांगला मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भौतिकउपचार तज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 137 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, ७ वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५० येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 28 जानेवारी 2025 असणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2025 असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे