पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मेगा भरती निघाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वरिष्ठ निवासी, शिक्षक आणि कनिष्ठ निवासी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 26 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ निवासी, शिक्षक आणि कनिष्ठ निवासी.
– एकूण रिक्त पदे : 29 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, डीएम / एमसीएच किंवा एमडी/एमएस/डीएनबी.
– वेतन / मानधन : दरमहा 64,551 ते 80,250 रुपयांपर्यंत.
– वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 13 फेब्रुवारी 2025.
– मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://bavmcpune.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.