पुणे : मुंबईतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यासाठी 4 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’, मुंबई येथे पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलो आणि ज्युनियर रिसर्च फेलो या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 5 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलो आणि ज्युनियर रिसर्च फेलो.
– एकूण रिक्त पदे : 05 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : पीएच.डी., मास्टर्स.
– वेतन / मानधन : दरमहा 37000 ते 77000 पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 मार्च 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 एप्रिल 2025.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता : research.assistant@staff.ictmumbai.edu.in आणि cc to md.yadav@ictmumbai.edu.in किंवा pd.vaidya@ictmumbai.edu.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ictmumbai.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.