Health Tips : अनेकदा थकल्यासारखं वाटत असतं. अशक्तपणा जाणवत असतो. पण त्यावेळी काय करावं काय नाही हे समजत नाही. मात्र, अशक्तपणा हा घरगुती उपाय करून घालवता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याचा नक्कीच फायदा होऊ शकणार आहे.
जास्त वेळ उपाशी राहू नये
दीर्घकाळापर्यंत उपाशी राहू नये. प्रत्येक दोन ते तीन तासांच्या अंतराने थोड्या-थोड्या प्रमाणात जेवण करत राहावे. (Health Tips) यामुळे पचनक्रिया चांगली राहील. जेवणानंतर लगेचच झोपू नये, यामुळे जास्त आळस येतो.
डार्क चॉकलेट खावे
थकवा जाणवत असल्यास डार्क चॉकलेटचे सेवन करावे. कारण डार्क चॉकलेटमध्ये कॅफिन असते. तसेच सेरोटोनिनचे उत्पादन त्याच्या सेवनाने उत्तेजित होतात. (Health Tips) याशिवाय, झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून प्यायल्यास त्याचा मोठा फायदा होतो.
शुद्ध तुपात कांदा भाजून खावे
शुद्ध तुपात कांदा भाजून घ्यावा आणि त्याचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे अशक्तपणा दूर होईल आणि फुप्फुसांना फायदा होईल. (Health Tips) लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती बळकट बनवतात.
पोषक तत्त्वांनी भरपूर केळी
पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी हे चारही महत्त्वाचे पोषकतत्व केळीमध्ये आढळतात. ज्याचे सेवन केल्याने ऊर्जा तर मिळतेच पण थकवाही जाणवत नाही. तसेच बदामाचे खाणे देखील चांगले असते. (Health Tips) बदामामध्ये व्हिटॅमिन बी असते, जे अन्नाला उर्जेमध्ये रूपांतरित करण्याचे काम करते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची कशी? जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय…