शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीनची गरज भासते. हे अत्यंत महत्त्वाचे असे पोषकतत्व आहे. प्रोटीन हे शरीराच्या अनेक कार्यांमध्ये मदत करते. स्नायू, हाडे, त्वचा, केस आणि नखे तयार करण्यात प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्याच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रोटीनचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
सध्या बॉडीबिल्डिंगसाठी प्रोटीन पावडरचा सर्रास वापर केला जातो. स्नायू आणि हाडांच्या विकासासाठी ते आवश्यक असल्याने, जिममध्ये जाणाऱ्यांमध्ये त्याची मागणी लक्षणीय वाढली आहे. त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आवश्यक अन्नपदार्थांचा आहारात समावेश केला जातो. पण प्रोटीन पावडरचा जास्त वापर केल्याने तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. प्रोटीन पावडरमुळे पचन समस्या निर्माण होऊ शकते. प्रोटीन पावडरचे सेवन केल्याने पचनास त्रास होऊ शकतो.
दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी किंवा दुग्धशर्करा पचण्यात अडचण असलेल्या लोकांना दुधावर आधारित प्रोटीन पावडर वापरताना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता जाणवू शकते. कर्करोगाचा धोकाही असतो. अनेक प्रोटीन पावडरमध्ये जड धातू (शिसे, आर्सेनिक, कॅडमियम आणि पारा), बिस्फेनॉल-ए (बीपीए, ज्याचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो), असे घटक असतात. त्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.