मुंबई : अभिनेता सलमान खान हा त्याच्या चित्रपटामुळे नाहीतर मागील काही दिवसांपासून सतत देणा-या धमक्यांमुळे चर्चेत आहे. सलमान खानला 5 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली होती. यानंतर सर्वत्र या धमकीचा तपास सुरु होता. अशातच धमकी देणा-या 35 वर्षीय तरुणाला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे.
भिकाराम बिष्णोई ऊर्फ विक्रम (वय-35) कर्नाटकातून अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वरळी पोलीसांनी बुधवारी (दि.06) कर्नाटक येथून अटक केली आहे.
“मी लॉरेन्सचा भाऊ बोलत असून जिवंत राहायचे असेल तर सलमानने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा पाच कोटी रुपये द्यावे, तसे न केल्यास सलमानला ठार मारु”, असे त्याच्या मेसेजमध्ये नमूद होते. याप्रकरणी वरळी पोलीसांनी तांत्रिक तपासाआधारे या व्यक्तीस अटक केली.
दरम्यान, अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. 1998 मध्ये काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे.