पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत (एमपीएससी) १ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल बुधवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्यभरातून ७ हजार ६५२ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. एमपीएससीकडून मुख्य परीक्षेत पात्र ठरल्याची माहिती उमेदवारांना एसएमएस पाठवून कळवण्यात आली. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर निकाल जाहीर झाला. मुख्य परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळवण्यात येणार आहे.