Gold Silver Rate Today: सोने महाग झाले तरी त्याच्या मागणीत काही कमी होत नाही. पुढच्या महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. आज सोन्याची किंमत स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर 5,800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,327 रुपये प्रति ग्रॅम आहे.
सोन्याच्या आजचा दर काय?
आज 15 जानेवारी रोजी, सोमवारी सोन्याचा दर कायम असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 58,000 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 47,450 रुपये प्रतितोळा आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,270 रुपये प्रतितोळा आहे.
सोन्याचे दागिने खरेदी करण्याआधी सर्व प्रथम त्या दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते तपासा. नियमानुसार कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही.
चांदीच्या दरातही स्थिर
आज एक किलो चांदी 76,500 रुपये आहे. त्यामुळे आज सोन्याप्रमाणे चांदीचा दरही स्थिर आहे.
प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर
मुंबईत सोन्याचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. दिल्लीत सोनं 63420 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. पुण्यात सोन्याचा आजचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नाशकात 24 कॅरेट सोने 63300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नागपूरात 24 कॅरेट सोने 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोल्हापूरात 24 कॅरेट सोने 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.